बीड – बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासहित पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. शहरातील यंत्रणा लावण्यासाठी ऐंशी लाख रुपये आणले मात्र ते वाटपच केले नाहीत असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही भाजप मधील कुरबुरी कमी होत नसल्याचे चित्र आहे. बीड विधानसभा मतदारसंघात साठ हजारपेक्षा जास्त मतदान मायनस गेल्याने भाजपच्या स्थानिक जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांबद्दल नाराजीचा सुरु उमटत होता.
दरम्यान बुधवारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर होत असलेल्या अप्रप्रचारा विरोधात आंदोलन करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार होती.
मात्र पराभावामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी समोर खुर्च्यावर बसलेल्या पदाधिकाऱ्यावर आपला राग काढला. आम्हाला शंभर दोनशे लोक घेऊन यायला सांगताना तुम्हाला लाज वाटतं नाही का? कोट्यावधीची कामे तुम्ही करा, निवडणुकीत पैसे तुम्ही घ्या अन कामाला आम्हाला लावा असं म्हणत कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला.
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
बिडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शहरातील बूथचे नियोजन लावण्यासाठी 12 मी रोजी ऐंशी लाख रुपये आणले, मग ते कोणाला वाटप केले, आमच्यापर्यंत तर एक रुपयाही आला नाही. हे पैसे वाटप केलेलंच नाहीत. असं म्हणत राजेंद्र मस्के, देविदास नागरगोजे, मुन्ना फड यांच्यासह इतरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
Leave a Reply