माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली. माजलगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्रातील अनेक शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठेवी मिळत नसल्यामुळे माजलगाव तालुक्यातील ठेपेगाव येथील बालासाहेब पांडुरंग ढेरे या वृद्ध शेतकऱ्यांसह १६ खातेदारांनी फिर्यादीवरून ३० मे रोजी माजलगाव पोलिसांत ७४ लाख २४ हजार १३७ रुपयांच्या ठेवी परत मिळत नसल्यामुळे गुन्हा दाखल केला होता. यात बालासाहेब पांडुरंग ठेरे यांची यांचे ७ लाख २५ हजार ६१३ रुपये अडकलेले आहेत.
बीड पोलिसांनी सुरेश कुटे यास अटक केल्यानंतर माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता येथील न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा न्यायालय २ चे न्यायमूर्ती बी.जी. धर्माधिकारी यांनी त्यांची बाजू ऐकून घेत १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
यावेळी सरकारी वकील ऍड.पी. एन. मस्कर यांनी काम पाहिले.
Leave a Reply