News & View

ताज्या घडामोडी

सुरेश कुटे फरार !ठेवीदारांकडून गुन्हा दाखल!

बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप सोसायटी मध्ये ठेवलेल्या नऊ लाख आणि 13 लाख रुपये वेळेत परतून देता फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कुटे हे फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.च्या गलथान कारभाराचा फटका संपूर्ण मराठवाड्याला बसला आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले आहेत. कुटे दाम्पत्य केवळ वेळ मारून नेत आहेत आणि ठेवीदारांना पुढच्या तारखा देत आहेत. मात्र ठेवीदारांचा संयम अखेर तुटला. आज नऊ लाखाच्या ठेवीची मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने सेवानिवृत्त प्रा.महादेव मन्मथअप्पा आंधळकर यांच्या तक्रारीनंतर ज्ञानराधासह कुटे दाम्पत्य आणि कर्मचार्‍यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट आठ महिन्यापासून बंद आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले आहे. संयमाचा बांध तुटत आहे. मल्टीस्टेटचे मालक कुटे दाम्पत्य केवळ फेसबुकच्या माध्यमातून तारखांवर तारखा देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी नविन तारीख दिली जात आहे. संपूर्ण बीड जिल्हाच ज्ञानराधामुळे अडचणीत आला आहे. अखेर आज महादेव मन्मथअप्पा आंधळकर यांच्या फिर्यादीवरून नऊ लाख रूपयाच्या ठेवी मिळत नसल्याने सुरेश कुटे, अर्चना सुरेश कुटे, वाय.व्ही.कुलकर्णी, नारायण शिंदे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा ठेवीदार हे  बीड शहर पोलीस ठाण्यात गेले तेव्हा अर्ज द्या,वरीष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यावर सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.जेव्हा ठेवीदार पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्याकडे गेले तेव्हा शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला.

याच फिर्यादीमध्ये प्रतापसिंह ठाकूर यांचे देखील 13 लाख रुपये न देता फसवणूक केल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *