News & View

ताज्या घडामोडी

सुरेश कुटेवर सहा ते सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश !

बीड- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच शुक्रवारी एकूण सहा ते आठ तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एडवोकेट वीरेंद्र थिगळे आणि एडवोकेट अविनाश गंडले यांनी फिर्यादीचे वतीने न्यायालयात बाजू मांडली.

बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटने खातेदाराच्या पैशावर डल्ला मारलेला असून त्यापैकीच ज्ञानराधा मल्टीस्टेटने अनेक खातेदारांना चुना लावलेला आहे परंतु पोलीस प्रशासनाकडे अनेक खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी संगणमत करून फसवणूक केल्याबाबत रीतसर लेखी तक्रारी दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा दाखल न केल्याने दिलीपकुमार चिंचोलीकर खातेदारानी बीड येथील सत्र न्यायालयात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर कलम ४२०, ४०६, ४०९, १२० (ब) भा.दं. वि. प्रमाणे आणि कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थां मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये गुन्हे नोंदवण्याबाबत मागणी केली होती

त्यावरप्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात अॅड. वीरेंद्र वसंतराव थि गळे यांनी युक्तिवाद केल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर फौजदारी प्रक्रिया संहीता कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करुण तपास करणेबाबतचा आदेश मा. जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी दि.२४ मे रोजी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन माजलगाव शहर यांना दिला आहे.सादर प्रकरणात ॲड.विरेंद्र वसंतराव थिगळे यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड.कालिदास थिगळे व ॲड मिलिंद वघिरकर यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या एका प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांना न्यायालयाने कुटे वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,या प्रकरणात ऍड अविनाश गंडले यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *