बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे सर्वसामान्यांचे मत झाले आहे
बीड शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये तब्बल 51 शाखांच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार असणारी ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 रोजी कुठलेच ठोस कारण न देता अध्यक्ष सुरेश कुटे यांनी बंद केली त्यामुळे दहा हजार रुपयांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या हजारो ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले
गेल्या आठ नऊ महिन्यात सुरेश कुटे यांनी अनेक वेळा फेसबुक लाईव्ह करून तुम्ही पाणी होऊ नका असं म्हणत ठेवीदारांना वेगवेगळ्या तारखा दिल्या मात्र एक छदामही ठेवीदारांच्या खात्यावर जमा झाला नाही .तिरुमला समूहावर इन्कम टॅक्स च्या धाडी पडल्यामुळे ज्ञानराधा अडचणीत आल्याचे कारण देत कुटे यांनी वेळकाढूपणा केला.
या दरम्यान अनेक ठेवीदारांच्या घरात लग्नकार्य,मेडिकल इमर्जन्सी आली पण पैसे काही मिळाले नाहीत.अनेकांनी गेवराई, माजलगाव,बीड शहर,पेठ बीड,बीड ग्रामीण यासह अनेक पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दिले.मात्र पोलिसांनी या ठेवीदारांना हुसकावून लावले.
अनेकांनी एसपी नंदकुमार ठाकूर यांच्याकडे तक्रारकेली,मात्र त्यांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास सांगण्याऐवजी ठेवीदारांची समजूत काढण्याचा अन त्यांना कायद्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
सुरेश कुटे यांनी सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केली आहे हे धडधडीत दिसत असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना संरक्षण देत ग्राहकांना वाईट वागणूक दिली आहे.
कोणत्याही पोलीस ठाण्यात 25 लाख रुपयांपर्यंत अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मर्यादा आहे,मात्र त्यावरील रक्कमेचा अपहार असल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठवले जाते असे पेठबीड पोलीस ठाण्याचे प्रमुख मुदिराज यांनी सांगितले, मात्र दुसरीकडे परळी पोलिसात तब्बल साडेसात कोटींच्या फसवणूक प्रकरणी चंदूलाल बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याचाच अर्थ पोलीस कुटे यांना देऊन घेऊन सहकार्य करत असल्याची चर्चा सुरू आहे.
Leave a Reply