मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली दोन मे रोजी आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती गेल्या तीन दिवसापासून असंख्य कार्यकर्ते व नेते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते दरम्यान राजीनाम्याच्या निर्णय घेण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पवार म्हणाले की,मी घेतलेल्या निर्णयामुळे जनमानसात तीव्र भावना उमटली,राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी, माझ्या सांगाती असलेल्या जनतेत अस्वस्थता निर्माण झाली. मी फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते,असंख्य चाहते यांनी संघटूत होऊन एकमुखाने तर काहींनी ओर्टीक्ष भेटून मला आवाहन केले.
त्याच बरोबर देशभरातून,विशेषतः महाराष्ट्र भरातून अनेक कार्यकर्ते यांनी मी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे.माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही.आपण दाखवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी सर्वांनी केलेले आवाहन, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय,या सर्वाचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे याचा मान राखून,मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे.असे ते म्हणाले.
Leave a Reply