बीड- मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील बलभीम महाविद्यालयात कर्मचाऱ्याकडूनच विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याचा प्रकार घडला आहे.मात्र महाविद्यालय प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न करता मौन बाळगले आहे.
मराठवाड्यात सर्वदूर शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेचे बीड येथे सर्वात जुने बलभीम महाविद्यालय आहे.अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.अनेक उच्चपदस्थ अधिकारी या महाविद्यालयाने घडवले आहेत.
उच्च दर्जाचे शिक्षण आणि गुणवत्तेची हमी असल्याने शहरासह आसपासच्या भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात.मात्र या महाविद्यालयात गेल्या काही महिन्यात विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या घटना समोर आल्या आहेत.
महाविद्यालयात नोकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्यांकडून काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. चार महिन्यांपूर्वी एका कर्मचाऱ्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला सक्तीने स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली होती.
दरम्यान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संपलेल्या शैक्षणिक वर्षात शेवटच्या दिवशी एका कर्मचाऱ्याबाबत एका मुलीने लेखी तक्रार प्राचार्य यांच्याकडे केली.त्यावर स्टाफ मिटिंग मध्ये चर्चा देखील झाली.लेखी तक्रार आल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी उपस्थितांनी मागणी केली.
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
- एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
परंतु आज घडीला दीड महिना उलटून गेला तरीदेखील त्या कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही.या प्रकरणाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यापर्यंत न जाऊ देण्याची खबरदारी प्राचार्य व इतरांनी घेतल्याची चर्चा आहे.एका एवढ्या मोठ्या महाविद्यालयात जर मुलीच्या छेडचडीचे प्रकार होत असतील आणि त्यावर प्रशासन पांघरून घालणार असेल तर विद्यार्थी सुरक्षीत आहेत असा दावा करणे योग्य आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a Reply