परळी- माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मतदान शनिवारी सहा मे रोजी होणार आहे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे जवाहर वर ताबा कोणाचा मिळणार हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाहीये कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे.
परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि माजीमंत्री पंकजा मुंडे या बहीण भावांमध्ये प्रमुख लढत होत आहे.हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.उर्वरित जागांसाठी 6 मे रोजी मतदान होणार आहे.
दोन्ही बहीण भावांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्टा पणाला लावली आहे.दोन्हीकडून ही संस्था ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.दरम्यान मतदान शनिवारी होणार असले तरी या निवडणुकीचा निकाल मात्र औरंगाबाद उच्च न्यायालयाने राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जवाहर एज्युकेशन सोसायटी बाबत दत्तापा इटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना 6 एप्रिल रोजी न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला आहे. केवळ मतदान घ्या मात्र निकाल जाहीर करू नका असे म्हटले आहे.त्यामुळे येत्या 19 जुननंतर मतमोजणी होईल अशी शक्यता आहे.या निवडणुकीत 921 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Leave a Reply