News & View

ताज्या घडामोडी

images 2024 04 13T123233.446

पवारांची उद्या बीडला सभा !

बीड – इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.


बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १३ मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. या अनुषंगाने बीड लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांच्यासाठी शनिवारी (दि.११) रोजी शरद पवार यांची बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) येथे दुपारी ३ वा. जाहीर सभा होणार आहे.

या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आहे. सध्या सभेचे नियोजन सुरू आहे. स्वत: आ.संदीप क्षीरसागर नियोजनाची सुत्र सांभाळून आहेत. दरम्यान या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *