आष्टी- एकीकडे कुणबी प्रमाणपत्र काढून एक निवडणूक ओबीसी प्रवर्गातून लढवायची अन दुसरीकडे लोकसभा निवडणूक मात्र मराठा म्हणून लढवायची असा उद्योग विरोधी उमेदवार करत असल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक होत असल्याचे स्पष्ट केले. गावातले सरपंच सांगत आहेत की लोक ऐकत नाहीत,त्यांना सांगा आरक्षण दिल आहे,ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,लोकसभेला दगाफटका झाला तर आगामी काळात विकास होणार नाही असेही मुंडे म्हणाले.
बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथे आयोजित सभेत धनंजय मुंडे यांनी जोरदार बॅटिंग केली.बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करताना मुंडे यांनी देश विकासाकडे झेप घेत असताना पंकजाताई यांना निवडणूक देने आपली जबाबदारी आहे,त्या केंद्रीय मंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करतील.
जिल्ह्यात जाती पातीचे राजकारण सुरू असल्याबद्दल बोलताना मुंडे यांनी आम्ही काम करताना कधी जात पहिली नाही.स्व मुंडे साहेबांनी सुरेश धस,प्रकाश सोळंके,अमरसिंह पंडित,बाळासाहेब आजबे यांना आमदार केलं.मग आताच का जात पाहिली जात आहे,असा सवाल केला.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
आज समोरील उमेदवार हे जातीपातीचे राजकारण करत आहे. त्यांनी अगदी सुरुवातीलाच स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं. त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र गुपचूप काढून घेऊन त्याचा राजकीय लाभ एका निवडणुकीत घेतला. त्याऐवजी वीस – पंचवीस हजार गोरगरीब आणि गरजू लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला असता तर खरंच यांच्या मनाचा मोठेपणा आम्ही पाहिला असता. आता त्यांनी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी विरूद्ध मराठा अशी लढत नसून ओबीसी विरूद्ध ओबीसी अशीच लढत होत आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.
भारत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळात अनेक इतर देशांना मदत केली. आज कोट्यावधी कुटुंबांना मोफत राशन दिलं जातं. ते सुद्धा कोणाचीही जात किंवा धर्म न पाहताच दिलं जातं. याही पलीकडे जाऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्याच प्रकारची प्रगती आणि विकास बीड जिल्ह्याला अपेक्षित आहे. आता बीड जिल्हा सुद्धा जात-पात धर्म या गोष्टींना थारा न देता कर्तृत्व अंगी असलेल्या आणि विकासाची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच बीडची जनता लोकसभेत पाठवणार आहे, धनंजय मुंडे म्हणाले.
मराठवाड्याचं 165 टीएमसी पाण्याचे तुटीचे खोरे भरून काढण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे तयार आहे. यासाठी सुमारे एक लाख 17 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी खेचून आणवा लागेल. बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्रात वजन असलेला खासदार आपल्याला निवडून द्यावा लागेल. या तुटीतून सुमारे 42 टीएमसी पाणी हे आपल्या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. हे पाणी आल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी जलक्रांती होणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
Leave a Reply