बीड : माजीमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रा नवले यांच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवले काय निर्णय घेणार यावर लोकसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.
शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आज (दि.29) रोजी सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
प्रा.सुरेश नवले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेला रामराम ठोकत आपली नवी दिशा ठरविण्याचे संकेत दिले होते. आता पुढे काय ? असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात असतानाच आज सोमवारी (दि.29) सायंकाळी 6.30 वाजता याच अनुषंगाने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन सुर्या लॉनस या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेवून या विषयावर प्रदिर्घ चर्चा होणार आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर सुपेकर, श्रीमंत उबाळे, शिवाजी जाधव, शहादेव घोडके, नामदेव शेळके आणि बिभीषण चव्हाण यांनी केले आहे.
Leave a Reply