बीड -प्रचंड ऊन,घामाच्या धारा यामुळे वैतागलेल्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक यांनी संताप व्यक्त केला.दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यावर आपला राग व्यक्त करत उपसंचालक साबळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची माफी मागितली. ही बैठक शहरातील मिलिया महाविद्यालयात आयोजित केली होती.
औरंगाबाद विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेच्या बैठकीच्या आयोजन शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी करण्यात आले होते. बीड शहरातील मिलिया महाविद्यालयाच्या सभागृह आयोजित केलेल्या बैठकीत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना प्रारंभीच उपसंचालक अनिल साबळे यांनी उकाडा आणि बैठक व्यवस्था योग्य नसल्यामुळे उपस्थित सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची माफी मागितली आणि उन्हाच्या उन्हाळ्या कसलीच सुविधा नसलेला हॉलमध्ये बैठक झाल्याने दस्तुरखुर्द उपसंचालक अनिल साबळे यांनी नाराजी व्यक्त करून आपला संताप व्यक्त केला.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक साबळे यांनी दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी प्रधान सचिवाच्या सूचनेनुसार विविध विषयासंदर्भात बीड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत वर्ग जोडणे, संचमान्यता, आधार वैद्यता, पॅक परीक्षा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आदी विषयाच्या संदर्भात बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस बीड येथे जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठक उन्हामुळे आणि बैठक व्यवस्था योग्य नसल्याने आणि हॉलमध्ये प्रचंड गर्मी आणि उष्णता झाल्याने दस्तूरखुद्द साबळे यांनी उपस्थित सर्व परिवेक्षीययंत्रणा अधिकाऱ्यांची माफी मागितली. त्यांनी आपला राग शिक्षणाधिकारी यांच्यावर व्यक्त केला. या सर्व प्रकारामुळे मात्र उपस्थितामध्ये उलट-सुलट चर्चा झाली.
या बैठकीत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते.
Leave a Reply