तब्बल महिनाभरापासून पाणी नाही,कचऱ्याचे ढीग, अंधारेंच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !!
बीड- एकीकडे आदर्श बीड स्वच्छ बीड सुंदर बीड असा डांगोरा पिटणाऱ्या बीड शहर वासियांच्या नशिबी मात्र तब्बल 27 दिवसापासून निर्जळी आहे नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याविना नागरिक तडफडत असताना मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या डोळ्यावर मात्र गुत्तेदारांकडून किती कमिशन मिळते आणि त्यातून किती पैसे कमवता येतात याचीच पट्टी बांधलेली आहे त्यामुळे पाणीपुरवठा विभाग असो की स्वच्छता विभाग याला कोणी वाली उरलेला नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठल्याचे चित्र आहे तर पाण्याविना बीड वासियांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे
गेल्या एक एप्रिल पासून बीड शहर वासीयांना नगरपरिषदेमार्फत पुरवठा केल्या जाणाऱ्या नळाच्या पाण्याचा एक थेंबही आलेला नाही पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता टाळके यांचे टाळके फोडण्याची वेळ आता आली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाहीये आणि त्यामुळेच नगरपालिकेचे अधिकारी माजल्यासारखे करू लागले आहेत
बीड शहरातील प्रमुख बाजारपेठ किंवा शहराच्या आजूबाजूची नवीन वस्ती या प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत मोकाट जनावरे आणि डुकरे कुत्रे यांनी या कचऱ्यावर उच्छाद मांडला आहे महिनाभरापासून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव बॅक वॉटर योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे मात्र या गोष्टीचे मुख्याधिकारी नीता अंधारे असो अथवा नगरपालिकेतील प्रशासन यांना काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे
अधिकारी असो की पुढारी यांच्या घरी पाणीपुरवठा होत असल्याने सर्वसामान्य माणसाला काय त्रास सहन करावा लागतो हे त्यांना कळणार नाही बीड शहरातील स्वच्छतेचे टेंडर हे परभणी जिल्ह्यातील तेरा मेरा कंपनीकडे आहे या कंपनीच्या नावावर जरी टेंडर असले तरी मुख्याधिकारी अंधारे यांच्या भावाने पाटोदा येथील सरफराज नावाच्या व्यक्तीला कचरा उचलण्याचे टेंडर या कंपनीकडून घेऊन दिले आहे आणि त्यात मुख्याधिकारी यांच्यासह त्यांचा भाऊ देखील पार्टनर आहे अशी चर्चा नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गात व गुत्तेदार मंडळीत सुरू आहे एकूणच काय तर बीड शहरवासीयांचा जीव गेला तरीही अंधारे बाईंना घाम फुटणार नाही
Leave a Reply