बी एन्ड सी च्या मोमीन,शिंदेचा प्रताप !
बीड-बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक मधील शाखा अभियंता यांनी आपल्या प्रमोशनसाठी मुंबई वाऱ्या करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देखील हे शाखा अभियंता मुंबईत जाऊन सेटिंग लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक मधील शिंदे आणि मोमीन नावाचे दोन शाखा अभियंता हे वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात बोगस बिले काढण्याचा उद्योग असो की कार्यकर्त्यांच्या नावावर स्वतःची तुंबडी भरण्याचा प्रकार असो हे दोघेही आघाडीवर आहेत यांच्यासोबतच उपाभियंता असलेले चंद्रकांत बोराडे हे या सगळ्यांचे मोठे मुकादम आहेत बोराडे हे वरिष्ठांना आडवं तिडव बोलून शिवीगाळ करून आपले आणि कार्यकर्त्यांचे काम करून घेतात तसेच शिंदे आणि मोमीन यांना देखील उपक्रम करतात अशी चर्चा बांधकाम विभागात अनेक वर्षापासून सुरू आहे
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मागील महिन्यात लागली सर्वत्र निवडणुकीचे धामधूम सुरू असताना शिंदे आणि मोमीन हे दोघे मात्र उपअभियंता म्हणून आपले प्रमोशन व्हावे यासाठी धडपड करत आहेत मार्च महिन्यात आठ ते दहा वेळा मुंबई वारा केल्यानंतर एप्रिलमध्ये देखील यांच्या मुंबई वाऱ्या सुरूच होत्या आचारसंहिता असताना हे कोणामार्फत सेटिंग लावत आहेत आणि हा आचारसंहितेचा भंग नाही का अशी चर्चा आता सुरू झाली आहे
तोंडे नुसतं तोंड बघत बसू नका !
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून साधारणपणे वर्षभरापूर्वी रुजू झालेले रवींद्र तोंडे हे कोणत्याच प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे गप्प बसायचं जे पदरात पडते ते घ्यायचं आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना मोकाट सोडून द्यायचं अशी काहीशी कार्यपद्धती तोंडे यांची आहे बोराडे मोमीन शिंदे हे कोट्यावधी रुपयांचे बोगस कामे करत असताना तोंडे मात्र केवळ तोंड बघत बसत असल्याचे चित्र आहे
Leave a Reply