नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
- आजचे राशोभविष्य!
भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 8.4 कोटी तर महिला मतदारांची संख्या 8.23 कोटी आहे. प्रथम मतदारांची संख्या 35.67 लाख आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी –
पश्चिम बंगाल: 77.57%
त्रिपुरा: 76.10%
पुडुचेरी: 72.84%
आसाम: 70.77%
अरुणाचल प्रदेश: 63.26%
अंदमान आणि निकोबार: 56.87%
बिहार: 46.32%
उत्तर प्रदेश: 57.54%
उत्तराखंड: 53.56%
छत्तीसगड: 63.41%
जम्मू आणि काश्मीर: 65.08%
लक्षद्वीप: 59.02%
मध्य प्रदेश: 63.25%
महाराष्ट्र: 54.85%
मणिपूर: 67.46%
मेघालय: 69.91%
मिझोरम: 52.62%
नागालँड: 55.75%
राजस्थान: ५०.२७%
सिक्कीम: 67.58%
तामिळनाडू: 62.02%
Leave a Reply