307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात !
बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी पालकमंत्री यांच्या डाव्या उजव्या बाजूने फिरणारे खांडे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्हा पोलीस दलामध्ये राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती झाल्यामुळे पोलीस हे राजकीय नेत्यांच्या दरबारात मुजरा घालणारे झाल्यासारखे वाटू लागले आहेत बीडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या विरोधात उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासह इतर गंभीर गुन्हे दाखल झाले हे गुन्हे दाखल होऊन जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लोटला मात्र तरीदेखील अद्याप खांडे याला अटक करण्यात आलेली नाही एकीकडे आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केल्याचा दावा एस पी ठाकूर करतात तर दुसरीकडे हाच खांडे विद्यमान पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री तथा भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासोबत फिरताना दिसून येतो नेमका पोलिसांवर कोणाचा दबाव आहे थेट मुख्यमंत्र्यांकडून सूत्र हलवली गेली आहेत का किंवा मुंडे बंधू भगिनींनी खांडेला पाठीशी घालण्याचे ठरवले आहे अशी चर्चा होऊ लागली आहे
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
बीड तालुक्यातील हनुमान जगताप या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर देखील मागील वर्षी हल्ला झाला होता त्यात देखील खांडे हा आरोप होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची हिंमत दाखवली नाही आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांवर सुपारी देऊन हल्ले करायचे असे प्रकार खांडे याने केल्याची चर्चा आहे
कुंडलिक खांडे यांच्या विरोधात गुटखा तस्करी प्रकरणात देखील गुन्हे दाखल झालेले आहेत एखाद्या सर्वसामान्य आरोपी विरोधात जर दोन-तीन गुन्हे दाखल झाले तर पोलीस त्याच्यावर तडीपारीची कारवाई करतात स्थानिक गुन्हा शाखेमार्फत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला कारागृहात पाठवले जाते मग खांडे हा बीडचा बादशहा आहे की काय किंवा एस पी पासून शिपायापर्यंतचे पगार खांडे करतो की काय अशी चर्चा होऊ लागली आहे
बीडच्या पोलीस दलाच्या डोळ्यावर राजकीय पुढार्यांनी आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांनी पैशाची अशी काही पट्टी लावली आहे की ज्यामुळे 307 मधील आरोपी मोकार फिरत असताना देखील त्याला अटक केली जात नाही नंदकुमार ठाकूर नावाचे पोलीस अधीक्षक बीडला आल्यापासून कुंडलिक खांडे असोत की सत्ताधाऱ्यांचा कोणीही पदाधिकारी लोकांना भर रस्त्यात मारणे गुटख्याची तस्करी करणे वाळू तस्करी करणे असे धंदे करतो आणि एस पी व त्यांचे पोलीस दल मात्र पैशाच्या पुढे कारवाई करत नाहीत असे चित्र दिसू लागले आहे विशेष बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री असणारे धनंजय मुंडे हे देखील खांडेसारख्याला पाठीशी घालत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे
एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे खांडेसारख्या 307 मधील प्रमुख आरोपीला मोकार सोडायचे ही एसपी नंदकुमार ठाकूर यांची आणि बीड ग्रामीण पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्याची कुठली पद्धत आहे असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे
राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री तथा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या गाडीत सोबत कोण फिरत आहे त्यांच्यामुळे आपल्या इमेजला धक्का बसेल का गुन्हेगार आपण सोबत घेऊन फिरत असू तर सर्वसामान्य मतदार आपल्या बाजूने राहणार का याचा विचार करणे गरजेचे आहे आचारसंहिता लागू असताना जर खांडेसारखा आरोपी उजळ माथ्याने हिंडत असेल तर बीडच्या पोलिसांनी बांगड्या भरलेल्या बऱ्या
Leave a Reply