माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांना रस्त्यावर बेदम चोप दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण प्रकरणावरून आ सोळंके यांच्या घरी झालेल्या जाळपोळ प्रकरणी आपले नाव का घेतले म्हणून सोळंके यांना मारहाण झाली.
नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून वादात सापडणारे आ सोळंके यांचे पीए महादेव सोळंके आता पुन्हा एकदा भर रस्त्यात मारहाण झाक्याने चर्चेत आले आहेत. त्यांना भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत झोडपले. मारहाण करणारा तरुण तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्याने महादेव सोळंकेला फरफटत ओढत नेले आहे.
पाच महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड, जाळपोळ प्रकरणात विनाकारण माझे नाव का गोवलेस? अशी विचारपूस करत महादेव सोळंके यांना भररस्त्यात तरुणाने बदडले. यावेळी महादेव सोळंके यांना रस्त्याने फरफटत ओढत नेत कपडे फाटेपर्यंत मारहाण होत असताना बघ्याची गर्दी जमली होती.
Leave a Reply