News & View

ताज्या घडामोडी

अजित पवारांना धक्का,लंके यांचा राजीनामा !

अहमदनगर- पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आ निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या लंके यांनी अहिल्यानगर अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. आता शरद पवारांचा मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार असल्याचे निलेश लंके यांनी जाहीर केले.

तसेच चार महिन्यापूर्वीच कटू निर्णय घ्यावा लागणार असे सांगत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार, असे त्यांनी घोषित केले. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीची राजीनामा मेलद्वारे पाठविणार असल्याचे लंके यांनी जाहीर केले. ही घोषणा करताना लंके हे भावूक झाले.

त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेविरुद्ध  निलेश लंके अशी लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरमध्ये शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब असा जोरदार सामना रंगणार आहे.
पारनेरमधील सुपा येथे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.


निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्कांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोपही लंके यांनी केला आहे. तुम्ही एक तरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का ? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालविण्याचे काम ते करत आहेत.

न्यूज अँड व्युजच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा !


या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे. गावाचे गावे पॅक करा. आपल्या तालुक्याची अस्तित्वाचे लढाई आहे, असे आवाहन निलेश लंके यांनी केली आहे. ते येतील पैसे देतील. पैसे घेऊन जा, अशी सांगायची भूमिका घ्या. आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *