बीड- शिवसंग्राम च्या प्रमुख तथा स्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट बीड लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा पक्का केला आहे.येत्या दोन दिवसात अपक्ष लढायचं की महाविकास आघाडीकडून हे निश्चित केले जाईल अशी माहिती मेटे यांनी दिली.
ज्योती मेटे यांनी मंगळवारी स्व विनायक मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.
ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, असे असतानाच ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Leave a Reply