मुंबई- केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी जी प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला.
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनवणे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे.कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे म्हणून सोनवणे परिचित होते.
2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती.तत्कालीन भाजप खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोनवणे यांना पाच लाखापेक्षा अधिक मतदान मिळाले होते.
- जिल्हा परिषदेत अडीच कोटींचा घोटाळा!शिक्षकांवर गंडांतर!
- आजचे राशीभविष्य!
- Axis Bank ने पुन्हा ग्राहकांना दिला झटका, मुदत ठेवीवरील व्याजदर केले कमी
- प्रति शिक्षक वीस लाखाप्रमाणे शंभर कोटी केले गोळा!
- एका अपघातात बचावले, दुसऱ्यांदा नियतीने डाव साधला!
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केल्यानंतर ते मुंडे यांच्यावर नाराज होते.मात्र इन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
Leave a Reply