News & View

ताज्या घडामोडी

21 लाखांपेक्षा अधिक मतदार बजावणार हक्क !

बीड -बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 21 लाख 15 हजार 813 इतके मतदार असून यामध्ये 11 लाख 20 हजार 529 पुरुष व 9 लाख 95 हजार 245 स्त्री मतदार तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून 2 हजार 355 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागात 441 व ग्रामीण भागात 1914 मतदान केंद्र असणार आहेत. यातील 17 मतदान केंद्र क्रिटिकल आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ते मनुष्यबळ कर्तव्यावर असून आवश्यक ती वाहने उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.


लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रचार कालावधीत 95 लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. तितक्या खर्चाची मर्यादा निवडणूक विभागाकडून निश्चित केली गेली आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 25 हजार इतके शुल्क असेल तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना हेच शुल्क 12 हजार 500 रुपये इतके असणार असल्याची माहिती यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.

बीड लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 18 एप्रिल रोजी अधिसूचना निघेल. 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. 26 एप्रिल रोजीअर्ज यांची छाननी केली जाणार असून 29 एप्रिल रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे, त्यानंतर 13 मे 2024 रोजी बीड लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुंडे विरुद्ध कोण ?पहा स्पेशल रिपोर्ट !


बीड जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 355 मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये गेवराई मतदार संघात 397, माजलगाव 379, बीड, 382 आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघात 440, केज 415 आणि परळी विधानसभा मतदारसंघात 342 मतदान केंद्रांचा समावेश आहे .


मतदानासाठी बॅलेट युनिट सीयु व व्हीव्हीपॅट उपलब्ध
लोकसभा निवडणुकीसाठी 2 हजार 355 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 2 हजार 828 बॅलेट युनिट तसेच तितकेच कंट्रोल युनिट आणि 3 हजार 64 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून घेण्यात आले आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर 2 बॅलेट युनिटची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *