नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल.
देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दहा वर्षाच्या काळातील विकास कामे यावर एनडीए कडून जोरदार प्रचार सुरू आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्फत भारत जोडो न्याय यात्रा काढून सत्ताधारी लोकांवर टीका सूरु आहे.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
अशात निवडणूक आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दरम्यान आयोगाने उद्या पत्रकार परिषद बोलावली असल्याने उद्यापासून आचारसंहिता लागणार हे निश्चित झाले आहे.
Leave a Reply