नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने देशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.यामध्ये महाराष्ट्रातून वीस नावे जाहीर झाली आहेत.नागपूर मधून नितीन गडकरी,बीडमधून पंकजा मुंडे,पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर चंद्रपुरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवण्यात आले आहे. मात्र, मुंबईत अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्राचा वापर केला.
मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातून विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. उत्तर मुंबईत पियूष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकज मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारत पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
Leave a Reply