मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे मंचावर होते.रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
आमदार रवींद्र वायकर यांची नजिकच्या काळात नेते पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्यावर दिली होती. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992 मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत.
Leave a Reply