शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.
भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कोण उमेदवार असणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी देखील चर्चा सुरू आहे.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा सुरू केला असून शनिवारी शिरूर तालुक्यात संपर्क दौरा केला. शिरूर येथील सिद्धेश्वर संस्थान येथील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,विधानसभेत माझा पराभव का झाला हे मी सांगू शकत नाही,पण आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला सांभाळून घ्या,मी तुमची काळजी घेईल.
या कार्यक्रमाला आ सुरेश धस,आ बाळासाहेब आजबे, खा प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.
Leave a Reply