बीड- कपड्याच्या दुकानात जायचे,दोन चार ड्रेस चोरायचे असा प्रकार करत करत तब्बल चार लाख रुपयांचे कपडे चोरणाऱ्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी अटक केले.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या चोराच्या मुसक्या आवळल्या.
जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात दुकान चे मालक श्री राहुल कदम राहणार घोसापुरी यांनी तक्रार पोलीस ठाणे बीड शहर येथे दाखल झाली होती.
पोलीसांनी यात तात्काळ या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली असतां माहिती मिळाली की दररोज दोन ते चार ड्रेस दुकानातून चोरी जात असे. सीसीटीव्ही फुटेज वरून यातील चोरट्यांची माहिती मिळाली. खरेदी करण्याच्या बहाण्याने तो येत असे. परंतु दरम्यान यातील चोरटा यास त्याची चोरी उघड झाली आहे ही माहिती मिळाल्या नंतर हा फरार आला होता आणि गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु परवा सायंकाळी तो पुन्हा अशी चोरी करण्यासाठी कालिका नगर मध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली यावरून तेथील एमएससीबीचे ऑफिसच्या पाठीमागून तो संशयास्पद फिरत असताना अटक करण्यात आली. अटक केलेल्या इसमाचे नाव गणेश अर्जुन परळकर राहणार केतुरा, तालुका बीड असे आहे. चोरलेल्या माला बद्दल सुरुवातीस तो उडवांउडवी चे उत्तरे देऊ लागला, पण नंतर मात्र पोलिसी भाषेत विचारताच त्याने मुद्देमाल काढून दिला. यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल एकूण किंमत साडे चार लाख रुपये जप्त करण्यात आला आहे.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विश्वंभर विश्वंभर गोल्डे यांच्या नेतृत्वाखाली शीतलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक, बीड शहर, पोलीस जमादार बाळासाहेब शिरसाठ, गोवर्धन सोनवणे, राजेंद्र मुंडे, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुसेण पवार यांनी पार पाडली आहे.
Leave a Reply