अंतरवली सराटी- गेल्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळापासून सगेसोयरे अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे रविवारी चांगलेच संतापले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ते थेट मुंबईकडे निघाले आहेत.त्यांना समजावून सांगण्यासाठी मराठा बांधव सोबत आहेत.
सराटी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले की,मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो. माझा त्यांनी बळी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही,” असेदेखील जरांगे म्हणाले.
मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातील २ आणि अंबड तालुक्यातील एकजण नारायण राणेंनी उचलून नेला आहे. त्यांच्या माध्यमातूनही आता पत्रकार परिषदा चालू होणार आहेत. देवेंद्र फडणवीस जर असं करू नको म्हणाले तर नारायण राणेंची असं काही करण्याची हिंमत नाही. त्यामुळे हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. फडणवीस म्हणाले तर एका मनिटात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईल,” असाही आरोप जरांगे यांनी केला
Leave a Reply