News & View

ताज्या घडामोडी

दुष्काळी बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक वर करोडोंची उधळपट्टी !

बीड-महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्यात शासन आणि प्रशासनाच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांचा चुराडा केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील चांदी होणार आहे हे निश्चित.

कायम दुष्काळ पाचवीला पूजलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.राज्याचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील असले तरीही शेतकरी आत्महत्या मध्ये घट होऊ शकलेली नाही.

बीड जिल्ह्यासह राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग आहेत.विशेषतः मराठवाड्यात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा देखील मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे दुष्काळ असताना जिल्हा प्रशासन असो की राज्य सरकार फारसे गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.18 फेब्रुवारी पासून बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे.यावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांची उधळण करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची हास्य जत्रा असो की गायिका अभिलाषा पांडा अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम.तसेच विविध वस्तूंचे प्रदर्शन असो की कृषी प्रदर्शन यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी लोकांवर क्रीडा स्पर्धांच्या नावाखाली 18 तर 22 या दरम्यान लाखोंची उधळपट्टी करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी असोत की इतर विभागाचे अधिकारी या कार्यक्रम साठी स्वतःच्या मूळ कामाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *