News & View

ताज्या घडामोडी

अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

1987-1989 या काळात अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकून आले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सामील झाले. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रिपदाची जबाबदारी दिली. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *