नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.सरकारने यापूर्वी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारत रत्न सन्मान जाहीर झाला. आता, देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांच्या नावांची मोदींनी घोषणा केली असून त्यामध्ये, डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांनाही भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देशातील या ३ भूमिपुत्रांना भारत रत्न देण्यात येत असल्याचे जाहीर केले
Leave a Reply