बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे अधिकारी, कर्मचारी आपले घर भरत आहेत.
बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र एक आणि दोन मध्ये गेल्या दहा बारा वर्षांपासून शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांचे राज्य आहे.शाखा अभियंता असणाऱ्या एस डी शिंदे यांच्याकडे कधीकधी उपअभियंता म्हणून चार्ज असतो तर कधी मोमीन किंवा ठाकूर आणि गेल्या फोन वर्षांपासून बोराडे यांच्याकडे हा कारभार आहे.
बांधकाम विभागात टेंडर डॉक्युमेंट तयार करण्यापासून ते बिल लिहिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर वर तयार करावी लागते.एमबी,इस्तीमेत, वर्क ऑर्डर अशी सगळी कामे कॉम्प्युटर वर केली जातात.यासाठी या दोन्ही कार्यालयात स्वतंत्र कक्ष देखील आहे.त्यासाठी आठ दहा लोकांना सरकार पगार देखील देते.
मात्र आपल्या कार्यालयात काम केल्यास खिशात दहा रुपये पडणार कसे असा विचार करून या कार्यालयाने खाजगी व्यक्तीकडून ही कामे करून घेण्यास सुरुवात केली. सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या नावाने आणि अशाच आणखी काही नावाने फर्म काढून बांधकाम विभागाने या खाजगी व्यक्तीला मार्केट रेट पेक्षा अधिक दराने बिल अदा केले आहेत.
सॉफ्टटेक या एजन्सीला दररोज किमान 24 ते 48-49 हजाराचे एक याप्रमाणे चार पाच बिले दिली जातात.म्हणजेच महिन्याला किमान तीस ते सत्तर लाख रुपये दिले जातात.आता एवढे काम होते का,अन हा पैसा कोण कोण वाटून घेतो याची चौकशी होणे गरजेचे आहे.
सॉफ्टटेक कॉम्प्युटर वर एस डी शिंदे असोत की चंद्रकांत बोराडे हे एवढी मेहरबानी का दाखवत आहेत याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.या सॉफ्टटेक एजन्सीकडे एखादे काम घेऊन सरकारी कर्मचारी किंवा खाजगी व्यक्ती गेल्यास त्याला वेगळे पैसे मोजावे लागतात.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
एका खाजगी फर्म ला दररोज लाखो रुपये देण्याच्या या प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.त्याचबरोबर शिंदे,मोमीन,ठाकूर, बोराडे यांच्यासह बांधकाम विभाग क्र दोन मधील कार्यकारी अभियंता मार्कंडे, उपअभियंता पानसंबळ यांची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे.
Leave a Reply