News & View

ताज्या घडामोडी

शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवे नाव दिले आहे.अद्याप चिन्ह मिळालेले नाही .

शरद पवार यांच्याकडून ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव दिले आहे. आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.

तर शरद पवार गटाकडून पक्षासाठी ‘वटवृक्ष’ या चिन्हाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणता ही निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या पक्षाला वटवृक्ष हे चिन्ह मिळाल्यास त्यांना राज्यात मोठा फायदा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बुधवारी निवडणूक आयोगाला पक्षासाठी ३ नावांचा प्रस्ताव पाठवला होता. यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या ३ नावांचा समावेश आहे. त्यानुसार आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्का मोर्तब केले आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील ४१आमदार, नागालँडमधील ७ आमदार
,झारखंड १ आमदार,लोकसभा खासदार २,महाराष्ट्र विधानपरिषद ५,राज्यसभा १

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील आमदार १५, केरळमधील आमदार १,लोकसभा खासदार ४,महाराष्ट्र विधानपरिषद ४, राज्यसभा – ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *