News & View

ताज्या घडामोडी

खरेदी विक्री संघ बिनविरोध !

बीड – बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी बिनविरोध झाली असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे ९ तर महायुतीचे ६ असे एकूण १५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे.

बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ म. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२४ ते २०२८-२९ साठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा जागेसाठी १५ उमेदवार राहिल्याने सदर निवडणूक बिनविरोध पार पडली. यात सेवा संस्था मतदारसंघातून नाईकवाडे दत्तात्रय कमलाकर, भोगे रामा विठ्ठल, तुपे संग्राम जनार्दन, पोपळे साहेबराव दामोदर, गवते बबन देवराव, घुमरे गोपीनाथ दगडूबा, शिंदे विठ्ठल सुखदेव, महिला प्रतिनिधी संघातून घोडके आसरावती प्रल्हाद, पडुळे मंगल विश्वनाथ, वैयक्तिक मतदार संघातून काळे जगदीश वासुदेवराव, पवार राजेंद्र भगवान, डाके ज्ञानदेव राजेंद्र, विमुक्त जाती/जमाती मतदार संघातून नागरगोजे विक्रम सखाराम, इतर मागास प्रवर्गातून आखाडे सखाराम आनंदराव, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून वंजारे विठ्ठल मारुती असे पंधरा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे ९ तर महायुतीचे शिवसेना शिंदे गट १, भाजपा २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शिवसंग्राम १ असे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

सदर निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी दिनकर कदम, गंगाधर घुमरे, विलास बडगे, अरुण डाके, तानाजी कदम, गणपत डोईफोडे, दिलीप आहेर, माजी आ.अमरसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे, मुखिद लाला, ॲड.खाजाभाई, प्रविण सुरवसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बिनविरोध निवडणूक पार पडताच विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *