मुंबई- नाटक,हिंदी, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते,मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
अशोक सराफ यांनी शेकडो मराठी चित्रपट आणि अनेक हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या अभिनयाने महाराष्ट्रातील रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनि त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply