नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल.
१५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असेल. यासाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होईल. तर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल.
- दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!
- थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाना हटवण्याचे नगरसेवकांना अधिकार!
- अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!
१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
आंध्र प्रदेशातील ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरियाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक, ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखंड १, पश्चिम बंगाल ५, ओडिशा ३ आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या ३ जागांचा समावेश आहे
Leave a Reply