मुंबई- मी शब्द पाळणारा माणूस आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणारच अस सांगितले होते ते आज पूर्ण झाले.हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे,मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत अस सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघाल्याची घोषणा केली.
आजचा दिवस आनंदाचा,विजयाचा दिवस आहे,गुलाल उधळण्याचा दिवस आहे,मी तुमच्या प्रेमापोटी येथे आलो,मनःपूर्वक आपले धन्यवाद. कुणबी नोंदी सापडल्या आहेत हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच यश आहे.
मराठ्यांना हक्काचं आरक्षण दिलं,सामान्य माणूस जेव्हा समाजाच्या प्रश्नावर एकत्र येतो तेव्हा काय होत हे जरांगे यांच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे.मी सुद्धा सामान्य माणूस आहे.शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं,शिबिर लावली आहेत अशा मागण्या यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखवल्या.
मराठा समाजाला ओबीसी च्या सवलती दिल्या जातील,सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ याला भरीव मदत करू. आत्महत्या केलेल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी दिली जाईल,आर्थिक मदत केली जाईल.असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
Leave a Reply