मुंबई- मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांचे मनापासून आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विजयाचा गुलाल उधळला.यावेळी शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे पेढे भरवून अभिनंदन केले.
मागील पाच महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत असल्याचा अध्यादेश काढला.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन,मंगलप्रभात लोढा यांच्यासह जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला
वाशी येथे जाहीर सभेत लाखोंच्या साक्षीने मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना गुलाल लावत अन पेढे भरवून आनंद साजरा केला.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,मुख्यमंत्री शिंदे आणि सर्वांचे मनापासून आभार. साडे चार महिन्यापासून आंदोलन सुरू होत.तिनशेपेक्षा जास्त पोरांनी आत्महत्या केल्या आहेत.या सगळ्याच स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर होती,अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते स्व विनायक मेटे आणि अण्णासाहेब जावळे यांच्या लढ्याची जबाबदारी आपल्यावर होती.
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
मुख्यमंत्री शिंदे यांनी नोंदी मिळवण्यासाठी समिती स्थापन केली,सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.मराठा समाजाकडून तुमचे धन्यवाद. आमचे लेकरं रस्त्यावर झोपले.
माझा शब्द मी खरा करून दाखवला.माझी एकच विनंती आहे,सग्या सोयऱ्यांचा झालेला आदेश काढला तो कायमस्वरूपी राहू द्या.सगळ्या केसेस मागे घेण्याच पत्र सरकारने दिले आहे.शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या.
Leave a Reply