मुंबई- राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत,त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे.यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल.नोंदि सापडण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.असे सांगत शनिवारी आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
54 लाख पैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याचे सरकारने सांगितले आहे .त्याबाबतचे पत्र आपल्याला दिले आहे.इतरांच्या वंशावळी जुळवण्याचे काम सुरू आहे.ज्यांना मिळाले आहेत त्याचा डेटा आपण मागितला आहे.
शिंदे समिती रद्द करायची नाही,या समितीने नोंदी सापडत राहाव्यात.वर्षभर मुदत वाढ द्या.ज्याची नोंद मिळाली त्याच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे.मोफत प्रमाणपत्र द्या.
अंतरवली सह महाराष्ट्र भरातील सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत यावर त्यांनी गृह विभागाकडून माहिती मागवल्याचे सांगितले आहे. मात्र त्याबाबत चे पत्र देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण देण्यात यावे.आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करायची नाही ही आपली मागणी आहे.त्यावर राज्य सरकारने सांगितले आहे की, केजी टू पीजी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल.मात्र ही खुट्टी आहे,जी आम्हाला मान्य नाही.
Leave a Reply