परळी- संपूर्ण देशभरात रामाच्या स्वागतासाठी रामभक्त उत्साहात सज्ज झाले आहेत.प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत म्हणजेच परळी शहरात हजारो रामभक्तांनी राम नामाचा गजर करत भव्यदिव्य शोभायात्रा काढली.पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह हजारो महिला,पुरुष रामाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत. या अनुषंगाने पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितिच्या वतीने भव्य शोभा यात्रा रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिरा परिसरातून निघाली. या सोहळ्यात तब्बल तीस हजार रामभक्त सामील झाले. यात केशरी, भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. सर्व रामभक्त खासकरून महिला वर्गाचे लोकोत्सव समिती पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथच्यावतीने विशेष आभार मानले गेले आहेत. शोभायात्रेत कोणत्या रामभक्त महिलेने फुगडी खेळली कोणी पावली खेळली कोणी टाळ, मृदंग, डोल, शंख वाजवले तर कोण्या रामभक्त पुरुषांनी लाठीकाठी खेळली. कोण राम, लक्ष्मण, सीता, हनुमान झाले. तर इतर रामभक्त महिला भजनी मंडळ तसेच वारकरी लोकांचा उत्साह नोंद घेण्यासारखा होता.
सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या रामायणामधील अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल साडे पाचशे वर्षांनी प्रभू श्रीरामांची न्याय व्यवस्थेच्या आदेशानुसार प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार झाले आहे. शहरात जागोजागी शोभयात्रा मार्गावर रांगोळी काढली गेली तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपल्या घरांवर तसेच व्यापारी बांधव आपल्या घरासह दुकानांवर भगवे झेंडे लावले तर कोणी गुढ्या उभारल्या आहेत तसेच विद्युत रोषणाई (लायटिंग) करून आनंदोत्सव द्विगुणीत केला. शोभायात्रेत सहभागी होताना रामभक्तांनी आवर्जून भगवे, केशरी, लाल वस्त्र परिधान केले. परळी वैजनाथ मधील सर्व व्यापारी वर्गाने शोभायात्रा संपन्न होईपर्यंत व्यवहार स्थगित ठेऊन मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होऊन लोकोत्सव साजरा केला.
प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर
◆ नगरपालिकेने शहरांत विविध ठिकाणी करणार लायटिंग केली तसेच शहरात विशेष स्वच्छ मोहीम राबविली.
◆ वैद्यकीय इमर्जन्सी विचारात घेता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा सज्ज होती, शोभायात्रे दरम्यान दोन रुग्णवाहिक उपलब्ध होत्या. प्रभू रामचंद्र कृपेने काहीही अघटित घडले नाही.
◆ २१ व २२ जानेवारी रोजी अखंड विद्युत पुरवठा देण्यासाठी महावितरण कंपनी सज्ज आहे.
◆ सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनही सुसज्ज, बी एस एफच्या ३ कंपन्यांसह तगडा बंदोबस्त होता.
◆ जागोजागी रामभक्तांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली तसेच ठिकठिकाणी खिचडी (डाळ / साबुदाणा), पाणी, फळवाटप तसेच राजगिरा लाडू सोबत विविध खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
Leave a Reply