News & View

ताज्या घडामोडी

निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग !

बीड -जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाई मध्ये सहभाग असल्याच्या संशयाने राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकांनी घराच्या पाठीमागे येऊन विनयभंग केल्याची तक्रार धारूर येथील एका महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे या संदर्भात धारूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


धारूर तालुक्यातील रमेश विष्णू नखाते रा. आवरगाव ता. धारूर याने अंजनडोह केंद्राचे तत्कालीन प्रभारी केंद्रप्रमुख असताना केलेल्या आपहार प्रकरणी कलम 420 अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्याप्रकरणी संबंधितास निलंबित करण्यात येऊन आले होते. निलंबन कालावधीत रमेश नखाते याला माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय देण्यात आले होते.

निलंबनामध्ये सहभाग असल्याचा समज करून त्याने धारूर येथील एका महिलेस मागील सहा महिन्यापासून त्रास देण्यास सुरुवात केली. दिनांक 22 12 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील दराचा वाजण्याचा आवाज झाल्याने आपण घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेला फोनवरून सांगितले. सदर महिला आणि दोघी माझ्या घरासमोर आल्या होत्या. त्यानंतर दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता रमेश नखाते तेथे मोटरसायकल जवळ उभा होता. मी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. मुलींच्या वसतिगृहात जात असताना तो माझ्या मागे मागे येऊन पाठलाग करीत असे हॉटेल समोरून चकरा मारीत असे. यामुळे आपली बदनामी करून त्रास देत असल्याबाबत आपण कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली होती.

दि. 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता सुमारास आठवणी बाजार असल्याने मी बाजारात आले असताना घरापासून काही अंतरावर नखाते भेटले व मला म्हणाला की, ‘तुझ्या ऑफिस मधील असलेले सहकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत तुझे संबंध आहेत’ असे म्हणून मला त्याने शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच पाठलाग करून आपल्याकडे बघून शिवीगाळ करतो. ‘तुला बघून घेईन, मी मेलो तर तुझ्या नावाची, कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवीन’, असे म्हणून धमक्या देतो.

अशी तक्रार धारूर पोलिसात दिल्याने पोलीस ठाण्यात दि. 15 जानेवारी 2024 रोजी कलम 354, 354 (ड) 504, 506 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.

26 लाखाचा अपहार; यापूर्वी केले होते निलंबित

शिक्षक रमेश नखाते याने यापूर्वी धारूर तालुक्यात प्रभारी केंद्रप्रमुख असताना सुमारे 26 लाखाचा अपहार केला होता. त्यामुळे रमेश नखातेला निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी अनेक वेळा सुनावण्या होऊन आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची मनधरणी करून व काही अधिकाऱ्याला हाताशी करून अपहाराची रक्कम भरल्यानंतर पुन्हा सेवेत बहाल करून संबंधिताला माजलगाव तालुक्या नियुक्ती देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *