बीड- नगर पालिकेत छोट्या मोठ्या गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग सीओ नीता अंधारे यांनी सुरुकेला आहे.काही गुत्तेदाराच्या माध्यमातून आपल्या भावाला नव्या धंद्यात सेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे.
बीड नगर पालिकेत रुजू झाल्यापासून नीता अंधारे यांनी प्रशासनाकडे कमी आणि गुत्तेदारांकडे जास्तीचे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.पाणी पुरवठा असो की स्वच्छता अथवा बांधकाम किंवा विद्युत विभाग या ठिकाणी काम करणारे शेख अफसर,पूरी, मुन्ना गायकवाड, रशीद मामु यांच्यासारखे अनेक छोटे मोठे गुत्तेदार सध्या मॅडम च्या दिमतीला असतात.
अंधारे यांनी नाट्यगृह असो की नगर परिषद इमारत याच्या रंगकामावर लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखवून आपले,आपल्या भावाचे आणि गुत्तेदार मंडळी चे भले करण्यात धन्यता मानत आहेत.केवळ कागदावर काम करायचे आणि बिल उचलायचे हे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत.
नगर परिषदेच्या कारभाराकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे देखील वेळ नसल्याने अंधारे मॅडम चा कारभार जोमात सुरू आहे.
Leave a Reply