News & View

ताज्या घडामोडी

ठाकरेंकडून अनिल जगतापवर अन्याय ! त्यांना निष्ठेचे फळ मिळणार- मुख्यमंत्री शिंदे !

अनिल जगताप यांच्यासह हजारो शिवसैनिकांचा थाटात प्रवेश सोहळा !

मुंबई- चाळीस वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर बीड जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवणाऱ्या अनिल जगताप यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला.आता ते मुख्य प्रवाहात आले आहेत,यापुढे त्यांना निष्ठेचे फळ मिळेल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

9 जानेवारी 2024 रोजी उशिरा रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप यांनी सरपंच, नगरसेवक, पदाधिकारी तथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी बीडमधून आलेल्या सर्व शिवसैनिकांचा हृदय सत्कार करून स्वागत केले आणि त्यांच्याशी मुक्त संवाद साधला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अनिलदादा जगताप यांनी बीडमध्ये जिवंत ठेवली. पण उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याकडे आणि वैयक्तिक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता असे होणार नाही. अनिलची निष्ठा आणि प्रमाणिकता मला माहित आहे त्यामुळे इथून पुढे बीडकडे माझे विशेष लक्ष राहील. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण अनेक निर्णय घेतले, अनेक प्रश्न सोडवले, महिला सक्षीमीकरण असेल तसेच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी देखील आपण पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या.

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून करत आहोत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आपण आजवर घेतले असून ते लोकांपर्यंत पोहचवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन यावेळी केले. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी आपल्याला देत राहण्याचे संस्कार बिंबवलेले आहेत त्यामुळे आपण त्यापद्धतीने कार्य करत आहोत.

लक्षात घ्या, अनेकांना वाटलं हे टिकणार नाहीत, याचं सरकार पडणार पण बाळासाहेब, दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेत दररोज प्रवेश होत आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड लावली. बीडमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे निश्चितच यावेळी उपस्थित राहील. बीडवासियांसाठी मी अनेक सेवा देण्याचे काम करणार आहे. अनिलसह तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवेल.

तुमच्यासारखी निष्ठावंत कार्यकर्ते हेच माझे शक्ती आहे. आजपर्यंत जो अन्याय झाला, त्रास झाला तो विसरा माझ्याकडे तुम्हाला सर्वांना न्याय मिळेल. यादरम्यान अनिलदादा जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वाईट काळात मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये शिवसेनेची ताकद राखून ठेवली. शिंदे साहेब तुम्ही आशीर्वाद, सहकार्य ठेवा आपल्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली अवघे बीड शिवसेनामय करून टाकू असा शब्द मी तुम्हाला देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *