News & View

ताज्या घडामोडी

शिक्षणाधिकारी शिंदेंनीच शिक्षण हक्क कायदा बसवला धाब्यावर !

शाळेवरील शिक्षकांना ठेवले दिमतीला !

बीड- शिक्षणाचा हक्क कायदा नुसार शिक्षकांना राष्ट्रीय कार्य आणि शिक्षण याशिवाय दुसरी कामे देऊ नयेत असे आदेश आहेत.मात्र बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनीच हे कायदे आणि नियम धाब्यावर बसवले आहेत.एक दोन नव्हे तर चार चार शिक्षक स्वतःच्या दिमतीला ठेवून घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.सीईओ पाठक याकडे लक्ष देत का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे

बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा कारभार सध्या नागनाथ शिंदे यांच्याकडे आहे.त्यामुळे पाचों उंगलीया घि में और सर कढई में अशी अवस्था शिंदे यांची झाली आहे.कोणीही यावे अन कलेक्शन जमा करून काम करून घ्यावे अशी पद्धत शिंदे यांनी सुरू केली आहे.

हे कलेक्शन करण्यासाठी त्यांनी प्रकाश डांबे,मुकुंद खांडे आणि राहुल चाटे यांची नियुक्ती केली आहे. यातील डांबे आणि खांडे हर दोघे शिक्षक आहेत.तर चाटे हे कंत्राटी कर्मचारी आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शिक्षकाला शिवण्याशिवाय जनगणना आणि मतदान प्रक्रिया हीच कामे देता येतात.त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे अन्य काम शिक्षकाकडून करून घेता येत नाही.ते नियमाला धरून नाही.

मात्र शासनाचे नियम पाळण्यासाठी असतात याचाच विसर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.शिंदे यांनी याबाबत आघाडी घेतली आहे.शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शिंदे यांनी या शिक्षकांना आपल्या दिमतीला ठेवले आहे.जे बेकायदेशीर आहे.

डांबे,खांडे आणि चाटे हे तिघे सिनियर मुख्याध्यापक असो की उपशिक्षणाधिकारी अथवा अन्य अधिकारी यांना ऑर्डर दिल्याप्रमाणे वागणूक देत असल्याने शिंदे शाही मनमानी कारभाराला सीईओ पाठक लगाम घालणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *