News & View

ताज्या घडामोडी

कोविड काळातील खरेदीचे ऑडिट सुरू !

सीएस बडे यांनी काढली ठाकर ला नोटीस !!

बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड च्या काळात जेवढी खरेदी झाली त्याचे मुंबई येथील सीए मार्फत ऑडिट सुरू झाले आहे.या चौकशीसाठी आपल्याकडील सर्व माहिती घेऊन हजर रहावे अशी नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बडे यांनी तानाजी ठाकर आणि वामन जोरे यांना काढली आहे.

2020 च्या वर्षभरात बीड जिल्हा रुग्णालयात कोविड साथीच्या नावाखाली जेवढी काही औषध आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली होती, ती वादात सापडली आहे. औषध निर्माण अधिकारी तानाजी ठाकर,अजिनाथ मुंडे व इतरांनी कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.

गेल्या दोन वर्षात याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या.आरोग्य विभागाकडून अनेकवेळा चौकशी देखील झाली. मात्र प्रत्येकवेळी चौकशीसाठी आलेल्या पथकाला पुसेशी माहिती न देता ठाकर अँड कंपनीने दिशाभूल केली.

आता याबाबत मुंबई येथील सीए जे एन गुप्ता एन्ड कंपनी मार्फत चौकशी सुरू झाली आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बडे यांनी ठाकर आणि जोरे यांना नोटीस काढली आहे.त्यानुसार 18 ते 24 जानेवारी दरम्यान सर्व खरेदी संचिका,रेकॉर्ड,प्रशासकीय, तांत्रिक मान्यता,पुरवठा आदेश,देयकाची मूळ प्रत,खरेदी अंती प्राप्त झालेल्या वस्तू,डिलिव्हरी चलन,साठा नोंदवही,जे एम पोर्टल वरील सर्व आवश्यक दस्तावेज आदि माहिती घेऊन हजर राहायचे आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात कोविड च्या काळात ठाकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची खरेदी बोगस केली होती.आता याची चौकशी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *