News & View

ताज्या घडामोडी

मैदानात लढा ना,विकासकामात खोडा कशाला घालता- आ संदिप क्षीरसागर यांनी खडसावले !

बीड-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.आमच्याशी वैर आहे तर मैदानात येऊन लढा,विकास कामात कशाला खोडा घालता, जनतेला का त्रास देता अस म्हणत आ संदिप क्षीरसागर यांनी अनेक विकास कामांना निधीची मागणी केली.विशेष म्हणजे पालकमंत्री मुंडे यांनी देखील त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी बीड येथे जिल्हा नियोजन सनीतीची बैठक झाली.यावेळी बोलताना आ क्षीरसागर म्हणाले की,राजकारण राजकारणाच्या मैदानात व्हावे, जनतेच्या कामांमध्ये खोडा निर्माण करून आपल्या विरोधकांना अडचणीत आणण्याचे ही भूमिका लोकशाही विरोधी आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना कशाला त्रास देता, घोडामैदान या वर्षातच आहे त्या ठिकाणी मैदानात लढा ना.

जनता या अवमनाला योग्य उत्तर देईल हा विश्वास आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मतदार संघातील खालील विकास कामांच्या बाबतीत व इतर महत्त्वाच्या विषयांकीत बाबत चर्चा केलेली आहे. सदरील विषय नियमोचीत आजच्या इतिवृत्तामध्ये समाविष्ट करावेत ही मागणी केली.

बीड शहरासह तालुका, शिरूर (का.) तालुका तेसच संपुर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे घोषीत होऊन देखील शासन स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबत सविस्तर उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. बीड शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून यावर उपाययोजना करावी लागेल. येत्या पंधरा दिवसात टॅंकर सुरू करावे लागतील.

दि.16 ऑक्टोबर 2023 च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुर्वी दि.11.10.2023 रोजी सर्व विभागाला विकास कामांच्या बाबतीत पत्र दिलेले आहेत. त्या बाबतीत काय निर्णय झाला? अजुनही माहिती नाही.

i-Pass प्रणालीची प्रशासकीय मान्यतांची माहिती पत्राद्वारे मागितली असता मला अजुनही देण्यात आलेली नाही. दि. 16.10.2023 च्या बैठकीचे इतिवृत्त कायम करताना अनुपालनास मान्यता घेताना, या विषयी सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. बीड मतदार संघातील अनेक कामे दुबार अथवा Overlapping शक्यता आहे.

आज होत असलेल्या बैठकीचे निमंत्रण व मागील बैठकीचे इतिवृत्त सात ते दहा दिवस पुर्वी देणे आवश्यक आहे. परंतु दि.4 जानेवारी रोजी देण्यात आले आहे. 16 ऑक्टोबर 2023 च्या बैठकीचे निमंत्रण दहा दिवस अगोदर देण्यात आलेले नाही. त्यामुळे मला त्या बैठकीला उपस्थित रहता आले नाही.

इतिवृत्तामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषदेने सुचविलेली कामे प्रस्तावित दिसून येत नाहीत. जिल्हा नियोजन समिती गठीत नसल्याने ही समिती कार्यरत असल्याचे शासन परिपत्रक आहे का? समितीच्या बैठकीतील अधिकार, मा.पालकमंत्री यांना देणे बंधनकारक आहे? असल्यास त्या बाबतचे शासन परिपत्रक मला देण्यात यावे.

बीड नगर परिषदेकडे महावितरणचे 36 कोटी थकबाकी आहे. ती थकबाकी भरण्यासाठी व दुष्काळ निवारण व कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी नगर परिषदेकडे दिलेला निधी महावितरणकडे वर्ग करण्यात यावा.

मा.पालकमंत्री यांच्या मान्यतेने घेतलेले विषय यावर चर्चा करणे गरजेचे आहे. ज्या विषयावर चर्चा होईल ते सोडुन बाकीचे विषय इतिवृत्तामध्ये घेता येणार नाहीत.

◼️कृषी विभाग
सन 2020 चा रखडलेला पीक विमा राज्य तक्रार निवारण समितीने डिसेंबर 2022 मध्ये बीड,वडवणी,गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे सांगितले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी अद्याप तरी अंमलबजावणी झाली नाही.

सन 2023 ला सोयाबीन पीकाला 25 टक्के अग्रीम देण्यात आलेला आहे. उर्वरित 75 टक्के देण्यात यावा. तसेच इतरही पीकांना अग्रीम देणे बाबत विमा कंपनीला आदेश व्हावेत.

सन 2023 मध्ये 25 टक्के अग्रीम पाच एक्करच्यावरील शेतकर्‍यांना अजुनही देण्यात आलेला नाही. तो देण्यासाठी आदेश करावेत.

10 नोव्हेंबर 2023 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे अजुनही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

शेतकरी कर्जाचे पुर्नगठण होणेसाठी बँकेला आदेशीत व्हावे.

सोयाबीनला 100 टक्के विमा देण्यात यावा, 25 टक्के रक्कम दिली व 75 टक्के रक्कम देणे बाकी. तसेच इतर पीकांना देखिल अग्रीम देण्यात यावा.

◼️आरोग्य विभाग
बोरफडी ता.बीड उपकेंद्र बांधकामास निधी.
दगडी शहाजानपुर ता.बीड उपकेंद्र बांधकामास निधी.
मन्यारवाडी उपकेंद्र नवीन इमारत बांधकामास निधी.

◼️नगर परिषद
नगर परिषद बीडकडुन नागरिकांकडे थकीत असलेली नळ पट्टी व घरपट्टीवर व्याज आकारणी केली जात आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषीत असून घरपट्टी व नळपट्टीच्या व्याजदरात सुट देण्यात यावी.
बीड शहरामध्ये नगर रोडवर बहुतांशी प्रशासकीय कार्यालय आहेत. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिला भगिणींची कार्यालयामध्ये कामानिमित्त आवक असते. परंतु सदरील ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. सदरील ठिकाणी तात्काळ शौचालयाची व्यवस्था व्हावी.
बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे (न.प.बीडने अंदाजपत्रक आराखडा तयार करणे व अभियंता नियुक्ती करून निविदा काढणे.) तसेच निधीची व्यवस्था करणे.
मुस्लिम समाजाच्या शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी वसतीगृह मंजुर आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
सामाजिक वनीकरण
युवा शांतीवन पाली येथील उर्वरित कामे करणे.
देवराई येथील आराखडा तयार करून कामे करणे.

◼️जिल्हा पशुसंवर्धन विभाग
बीड विधानसभा क्षेत्रात पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी शासनस्तरावरावर पाठपुरावा करणे.
जरूड ता.बीड येथे पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.
बोरखेड ता.बीड येथे पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.
ढेकणमोहा ता.बीड येथे पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.
नाळवंडी ता.बीड येथे पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.
खालापुरी ता.शिरूर का. येथे पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.

◼️महावितरण
बीड शहर अंतर्गत जुने पोल बदलणे व केबलद्वारे काम करणे.
पाली येथील 33 के.व्ही.चे काम सुरू करणे.
बीड व शिरूर का. तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी. देण्यात यावे.

◼️तिर्थक्षेत्र
श्री.क्षेत्र नारायणगड येथील मंजुर असलेल्या 23 कोटींच्या निधीची तरतुद शासनस्तरावर तात्काळ व्हावी.
श्री.क्षेत्र खंडेश्वरी देवस्थान पर्यटन विकास प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता घ्यावी.
श्री.क्षेत्र कपिलधार 100 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर, त्यास शासनस्तरावर मान्यता घ्यावी.
बीड विधानसभा क्षेत्रातील खालील तिर्थक्षेत्रांना ‘क’ दर्जा देणे.
श्री.क्षेत्र हनुमान मंदिर वायभटवाडी,
श्री.क्षेत्र किल्ले भगवानगड वंजारवाडी,
श्री.क्षेत्र साक्षातमाता मंदिर साक्षाळप्रिंपी ता.बीड
श्री.क्षेत्र चंदनशाहवली दर्गाह चौसाळा ता.बीड
श्री.क्षेत्र अंबाबाई देवस्थान देविबाभुळगाव ता.बीड
श्री.क्षेत्र सुलतान साहेब देवस्थान गोगलवाडी ता.बीड
श्री.क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान पाली ता.बीड
श्री.क्षेत्र राणुबाई देवस्थान लोणीघाट ता.बीड
श्री.क्षेत्र पोईचादेव देवस्थान मांजरसुंबा ता.बीड
श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान जेबापिंप्री ता.बीड
श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान कुक्कडगाव ता.बीड
श्री.क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान कमळेश्वर धानोरा ता.शिरूर का.

◼️शिक्षण विभाग
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा खोली बांधकाम.
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा दुरूस्ती करणे.
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा कंपाऊंड वॉल बांधकाम करणे.

◼️महिला व बालकल्याण विभाग
बीड 1 व 2, बीड नागरी, शिरूर कासार येथील प्रकल्पातील व प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील रिक्तपदे भरणे बाबत.
नवीन अंगणवाडी खोल्या देणे. (बीड व शिरूर कासार)

◼️क्रीडा विभाग
बीड जिल्हा स्टेडियम व तालुका स्टेडियम ता विकास व तालुका कार्यालयांतर्गत प्रस्तावित कामे व इतर बाबी.

◼️जिल्हा रूग्णालय
शासनस्तरावरून 30 खाटाचे आयुष रूग्णालय छठकच अंतर्गत मंजूर आहे. त्यास जागा उपलब्ध करून द्यावी.

◼️पंचायत समिती
पंचायत समिती,बीड आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील पुतळा बसवणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे.

◼️जलसंधारण विभाग
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यात सिमेंट नाला बंधारा होणे गरजेचे आहे.

◼️पंचायत विभाग
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन बांधकाम करायचे असून त्यास शासनस्तरावरून मंजुरीसह निधी मिळणेसाठी पाठपुरावा करणे.
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यातील जनसुविधेसाठी विशेष अनुदान अंतर्गत स्मशानभुमी संरक्षण भिंत व सुशोमीकरण करणे.

◼️जिल्हा जलसंधारण विभाग
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याची दुरूस्ती करणे गरजेचे.

◼️सार्वजनिक बांधकाम विभाग
भानकवाडी ते साळुंकेवस्ती या रस्त्यावरील नळकांडी पुल नसल्याने तेथे तीन बालकांचा पुराच्या पाण्यामध्ये मृत्यु झालेला आहे. सदरील नळकांडी पुल बांधकामासाठी मंजुरी देवून निधी देण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *