बीड- दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा परीक्षांचा निकाल 1 मे रोजी लागतो ,मात्र यावर्षी हा निकाल 6 मे रोजी निकाल लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.मात्र याबाबत राज्यातील बहुतांश शाळांना माहिती नसल्याचे दिसून आले आहे.
राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 28 एप्रिल 2023 रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्यानुसार दरवर्षी 1 मे रोजी जाहीर होणारा शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल 6 मे रोजी जाहीर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यंदा छत्रपती शाहू महाराज शताब्दी वर्षाची सांगता आहे.त्यामुळे 1 मी ऐवजी 6 मे रोजी निकाल विद्यार्थ्यांना हाती देण्यात यावा,तसेच शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात यावेत असे म्हटले आहे.
राज्य शासनाने हे परिपत्रक 28 एप्रिल रोजी काढले परंतु बहुतांश शाळांना याबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने शाळा 1 मे रोजीच्या निकालाच्या तयारीत आहेत.
दरवर्षी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी 1 मे ची आतुरतेने वाट पाहत असतात.निकाल हाती घेऊन पेढे भरवत हे विद्यार्थी आपलं यश साजरे करतात, मात्र यावर्षी त्यांना आणखी सहा दिवस वाट पहावी लागणार आहे.
Leave a Reply