बीड- गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.
बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर 13 वर्ष जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती.मात्र अचानक त्यांच्याकडील जबाबदारी इतरांवर देण्यात आली.परंतु पुन्हा त्यांना ही संधी पक्षाने दिली.
बीड जिल्ह्यात वाडी वस्ती तांड्यावर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांचे विचार पोहचवण्याचे काम जगताप यांनी केले.मात्र काही दिवसांपूर्वी उबाठा गटाने जगताप यांना सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
तेव्हापासून जगताप हर नाराज होते.त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.ते म्हणाले की,2009 ला उमेदवारी जाहीर झाली पण रात्रीतून काय झालं माहीत नाही माझी उमेदवारी कापण्यात आली.सातत्याने अन्याय करण्यात आला. रात्रंदिवस काम करत असताना अचानक पद काढण्यात आल.त्यावेळी हसावं की रडावं असा प्रश्न पडला.
पद गेल्यावर अनेकांना फोन केले पण कोणीच उत्तर दिलं नाही.येणाऱ्या विधानसभा निवडणूक साठी मी कामाला लागलो असताना माझ्यावर अन्याय केला. शिवसेनेत अंधार सेनेचे वर्चस्व वाढले आहे.गाठूड्याचे व्यवहार झाले.
Leave a Reply