बीड जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत बोगसगिरी करणारे आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या चौकशी अहवालात दोषी ठरवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघालेले कंत्राटदार आणि स्वतःला उद्योजक म्हणून घेणारे शशिकांत रंगनाथ कोठुळे आणि संतोष शामराव पडोळे या दोघांना जलजीवन प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून ते ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता यांच्यापर्यंत सगळी यंत्रणा कामाला लागले आहे त्यामुळे अशा भ्रष्ट आणि नालायक लोकांवर कारवाई होणार का हाच खरा सवाला आहे.
बीड जिल्ह्यात जलजीवन विषयांची जी १३६७ कामे मंजूर आहेत त्यातील 200 च्या आसपास कामे शशिकांत रंगनाथ कोठुळे आणि संतोष शामराव पडोळे या दोन गुत्तेदारांकडे देण्याचे पाप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सुनील दत्त धाबेकर शिवाजी चव्हाण बाळासाहेब वीर नामदेव उबाळे प्रदीप काकडे या अधिकाऱ्यांनी केले यांनी कोठुळे आणि पडोळे या दोघांवर फुकट मेहरबानी दाखवली नाहीत या दोन्ही कंत्राटदारांनी या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनाचा लाभ देत खुश केले आणि स्वतःच्या पदरात कोट्यावधी रुपये ची कामे पाडून घेतली एका कंत्राट दाराला तीन पेक्षा अधिक कामे देण्यात येऊ नयेत हा शासनाचा नियम कोठुळे आणि पडुळे यांच्यासाठी मात्र बाजूला ठेवण्यात आला कारण या दोघांनी एक कोटीच्या कामासाठी पंधरा ते वीस टक्के खर्च अधिकाऱ्यांवर केला एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी बोगस साहित्य वापरून बोगस अंदाजपत्रक तयार करून वाढीव टेंडर मंजूर करून घेतले याबाबत तक्रारी झाल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी चौकशी समिती नियुक्त केली
या समितीने उबाळे काकडे धाबेकर चव्हाण वीर हे अधिकारी आणि कर्मचारी दोशी असल्याचे तर स्पष्ट केलेच परंतु शशिकांत कोठुळे आणि संतोष पडोळे या दोघांवरही गुन्हे दाखल करून त्यांना आदेश दिले डिसेंबर मध्ये विभागीय आयुक्तांनी दिलेले आदेश अद्याप पर्यंत देखील अंमलबजावणी झालेले नाहीत हे विशेष कारण सी ओ पवार यांच्यापासून ते ग्रामीण पाणीपुरवठ्यातील शिपायापर्यंत साखर पेरणी केल्याप्रमाणे पैशांची पेरणी कोठुळे आणि पडुळे या दोघांनी केली आहे त्यामुळेच चार महिने झाले तरी या दोघांवरही गुन्हे दाखल झालेले नाहीत
Leave a Reply