नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता.
जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या.2003 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने गेल्या वर्षभरापासून ठेवीदारांच्या ठेवि देण्यास असमर्थता दाखवण्यास सुरवात केली.
जवळपास 200 कोटींपेक्षा अधिकच्या रकमेचा घोटाळा झाल्याने बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेच्या अध्यक्षांसह अनेक जण अटक झाल्याने सामान्य ठेवीदार हैराण झाले होते.
दरम्यान आरबीआय ने 29 डिसेंबर 2023 रोजी एक आदेश काढला,त्यानुसार बँकेचे लायसन रद्द करण्यात आले आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. बँकेत ठेवी असलेल्या ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ची रक्कम काढता येणार आहे.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
आतापर्यंत आरबीआय ने 185 कोटी रुपयांच्या ठेवी परत केल्या असून उर्वरित ठेवी लवकरच परत केल्या जातील असे आदेशात म्हटले आहे.
Leave a Reply