बीड- जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासणी आणि कामाची प्रगती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी गुरुवारी दौरा केला.क्वालिटी काम करा नाहीतर दंड भरा असा सज्जड ईशारा त्यांनी दिला.
सीईओ पाठक यांनी गुरुवारी गेवराई तालुक्यातील केकत पांगरी,रेवकी,तलवाडा,बाग पिंपळगाव या ठिकाणच्या कामांची पाहणी केली.पंतप्रधान आवास योजना,पानंद रस्ते,जल जीवन मिशन,घरकुल,रमाई आवास यासह इतर कामांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.
जल जीवनमिशन चे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, रोजगार हमी योजनेचे अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यासह कामावर जाऊन प्रत्यक्ष कामाचा प्रगती अहवाल त्यांनी पाहिला.
अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे आपल्या तक्रारी मांडल्या.कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.काम क्वालिटी चर नसेल तर दंड आकारला जाईल असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.
Leave a Reply